Kokan: चंद्रनगर क्रिकेट स्पर्धेत जे.के. स्पोर्ट्स विजेता

0
44
चंद्रनगर क्रिकेट स्पर्धेत जे.के. स्पोर्ट्स विजेता
चंद्रनगर क्रिकेट स्पर्धेत जे.के. स्पोर्ट्स विजेता

दापोली– दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील शिक्षण कला क्रीडा संस्था व ग्रामस्थ मंडळ चंद्रनगर आयोजित अंडरआर्म बाॅक्स नाईट क्रिकेट स्पर्धेत जे.के.स्पोर्ट्स गिम्हवणे या संघाने विजेतेपद पटकावले असून के.डी.पी. दापोली संघाला उपविजेता पदकावर समाधान मानावे लागले.https://sindhudurgsamachar.in/kokan-कणकवली-तालुक्यात-अवकाळी/

चंद्रनगर येथील शिक्षण कला क्रीडा संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात सातत्याने भरीव योगदान देत असून दरवर्षी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करीत असते. या संस्थेने नुकतेच अंडरआर्म बाॅक्स नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. दापोली तालुक्यातील अनेक संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विजेत्या व पारितोषिक प्राप्त संघांना रोख बक्षीस, आकर्षक ट्राॅफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील अंतिम सामन्यात जे.के. स्पोर्ट्स गिम्हवणे संघाने के.डी.पी. दापोली संघाचा निसटता पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. याशिवाय स्पर्धेत नाईट फायटर्स जालगांव या संघाला तृतीय क्रमांकावर तर साईतेज निगडे संघास चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले.

संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या आशीष भैरमकर याचा उत्कृष्ट गोलंदाज, अंकित कराडे याचा उत्कृष्ट फलंदाज तर शुभम चांदिवडे याचा मालिकावीर म्हणून गौरव करण्यात आला. शिक्षण कला क्रीडा संस्थेचे अध्यक्ष सदानंद मुलूख, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, सल्लागार विजय मुलूख, ग्रामस्थ मंडळाचे सचिव प्रवीण मुलूख, उपाध्यक्ष सुनील रांगले, संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश मुलूख, सचिव स्वरुप मुलूख, संदीप गार्डी, अजित थोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रुपेश बैकर, चंद्रकांत मिसाळ, जगन्नाथ पागडे, विनोद शिगवण, गणेश मिसाळ, दिपेश मुलूख, सचिन जगदाळे, प्रकाश जोगले, अनिल मुलूख, मंदार मुलूख, प्रतिक मुलूख, राजेंद्र मिसाळ, स्वप्नील मिसाळ, सुनील शिगवण, विजय मिसाळ, राजेंद्र शिगवण, दीपक शिगवण आदी अनेकांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here