दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी कु. श्रावणी कोळंबे हिच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षक बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, रेखा ढमके उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्गची-शान-कु-आर्/
श्रावणी कोळंबे हिच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. मानसी सावंत यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या विषयावर सविस्तर विवेचन केले. शाळेतील विद्यार्थी आरोही मुलूख, स्वरा कोळंबे, श्रेयश शिगवण, श्रेयश मुळे, अथर्व रांगले, विराज मुलूख, प्रसाद शिगवण, दीप शिगवण आदी विद्यार्थ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी आंबेलकर, सांची मिसाळ यांनी केले तर सौम्या बैकर हिने सर्वांचे आभार मानले.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/