🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l सुनिता भाईप l सावंतवाडी-
डोंगरपाल येथील श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. या प्रतिवार्षिक सोहळ्याच्या यानिमित्ताने डोंगरपाल येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-पाट-येथील-श्री-वडमळेश्वर/
सकाळी श्री सिद्धेश्वर महापुरुष समाधीची पुजाअर्चा व धार्मिक विधी होऊन दर्शनास आरंभ झाला. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी श्री स्वामी समर्थ मठ, डोंगरपाल यांचा हरिपाठ कार्यक्रम झाला.
दुपारी १ ते ३ महाप्रसाद कार्यक्रम झाला.
त्यानंतर डोंगरपाल ग्रामस्थ, महिला व इच्छुक भाविकांची भजनसेवा झाली.
सायंकाळी नवस करणे, नवस फेडणे,
रात्रौ सुश्राव्य भजन, पावणी तसेच
रात्रौ ११ नंतर भंडारा (महाप्रसाद) आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुमारे ३०० वर्षांपूर्वी डोंगरपाल सिद्धाच्या डोंगरावर एका सिद्ध योगी महापुरुषाने जिवंत समाधी घेतली होती.या ठिकाणी भंडारा पौर्णिमेला दरवर्षी भंडारा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला महाराष्ट्र तसेच गोव्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस करण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. देवस्थान कमिटी आणि डोंगरपाल ग्रामस्थ यांच्यावतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.