Kokan: तुळस येथील जैतिर उत्सव १९ मे पासून

0
23
तुळस येथील जैतिर उत्सव १९ मे पासून
तुळस येथील जैतिर उत्सव १९ मे पासून

वेंगुर्ला प्रतिनिधी – तुळस येथील प्रसिद्ध श्रीदेव जैतिराचा वार्षिक उत्सव शुक्रवार दि. १९ मे पासून सुरु होत आहे. यानिमित्त मंदिर परिसरात खेळणी, मिठाई, शेतीपयोगी, गृहपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. तुळस गावामध्ये माहेरवाशिणींसह पै-पाहुणेही आल्याने घरोघरी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.   https://sindhudurgsamachar.in/maharashtra-केस-आयएच-case-ih-ने-त्यांच्या-प/

तुळस गावासाठी हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. जैतिर देव संपूर्ण तुळस गावातील प्रत्येक घरोघरी जात असल्याने आपल्या देवाचे स्वागत करण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी तुळसवासीयांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. या उत्सवासाठी सिधुदुर्गाबरोबरच मुंबईपुणेगोवा यासह अन्य ठिकाणचेही भाविक मंडळी उपस्थित राहणार आहेत.

फोटो – जैतिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here