निकेत पावसकर यांजकडून
सिंधुदुर्ग (तळेरे), दि. 23 :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे (तालुका कणकवली) येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी आपल्या शालेय नातवंडांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पारंपारिक उटणे स्वतः बनवून विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी आजी आजोबांचे हे शुभ आशीर्वाद कणकवली तालुक्यातील सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत उटण्याच्या रुपात पोहोच केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिक्षक-हा-व्यवस्थेचा-कणा/
असलदे : येथील दिविजा वृध्दाश्रमाकडून तालुक्यातील विविध शाळेतील मुलांना मोफत उटणे वाटप करण्यात आले.
छाया : निकेत पावसकर
आज कालच्या तरुण पिढीला उटणे, कारटी, पणत्या, रांगोळ्या या पारंपारिक गोष्टींचा विसर पडत चालला आहे. आपली संस्कृती काय आहे हे जाणून देण्यासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी विद्यार्थ्यांना मोफत उटणे वाटण्याचा कार्यक्रम केला. उटण्याच्या माध्यमातून आजी आजोबांना आपल्या शालेय नातवडांना भरभरून आशीर्वाद व प्रेम पाठवले आहे.
कणकवली तालुक्यातील कणकवली कॉलेज कणकवली, विद्यामंदिर हायस्कुल कणकवली, एसएम हायस्कुल कणकवली, बाल शिवाजी इंग्लिश मेडीयम स्कुल जाणवली, कळसुली कॉलेज, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे, कासार्डे माध्यमिक विद्यालय, वारगाव प्राथमिक शाळा नं 1, वारगाव प्राथमिक शाळा नं 3, शेठ. नं. म विद्यालय खारेपाटण या शाळेतील विद्यार्थ्यांना उटणे वाटप करण्यात आले.