Kokan : देवगड पोलीस ठाणेतर्फे ड्रग्ज मुक्त कार्यशाळा संपन्न -पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे

0
62
देवगड पोलीस ठाणेतर्फे ड्रग्ज मुक्त कार्यशाळा संपन्न -पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे
देवगड पोलीस ठाणेतर्फे ड्रग्ज मुक्त कार्यशाळा संपन्न -पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

देवगड: देवगड पोलीस ठाणेतर्फे समाजजागृतीचे नवनवीन प्रयोग केले जात आहेत आणि त्याला कोकणवासीयांच्या भरगोस प्रतिसादही मिळत आहे. असेच एक ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा जनजागृती अभियान अंतर्गत आज रोजी कुणकेश्वर गावातील समुद्रकिनारी सुरू असलेल्या मैदानावरील क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन उपस्थित असलेले नागरिक, खेळाडू व आयोजक यांना अमली पदार्थाच्या विषयी माहिती देण्यात आली. अमली पदार्थ विषयक कायदे, त्याचे दुष्परिणाम व उपाय योजना याबाबत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. सदर कार्यक्रमाला सुमारे 120 नागरिक उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-आ-वैभव-नाईक-यांच्या-उपस्/

त्याशिवाय रामेश्वर हायस्कूल मिठबाव येथेही ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा जनजागृती अभियान अंतर्गत आज रोजी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या विषयी माहिती देण्यात आली. अमली पदार्थ विषयक कायदे, त्याचे दुष्परिणाम व उपाय योजना याबाबत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. सदर कार्यक्रमाला सुमारे 120 विद्यार्थी व 10 शिक्षक उपस्थित होते अशी माहिती देवगड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here