प्रतिनिधी – पांडुशेठ साटम
देवगड -: आज दिनांक २१/०८/२०२४ रोजी पोंभूर्ले (तालुका देवगड) येथे ग्रामपंचायत पोंभूर्ले, स्वराज्य प्रतिष्ठान पोंभूर्ले आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा देवगड संयुक्तपणे आयोजित रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.या शिबिरास जवळपासच्या गावातून अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. एकूण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान करत अमूल्य योगदान दिले.गावच्या प्रथम नागरिक प्रियांका धावडे यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करत गावापुढे आदर्श घालून दिला. https://sindhudurgsamachar.in/kokan-रवींद्र-चव्हाण-व-रामदास-क/
ग्रामपंचायत पोंभूर्ले ,स्वराज्य प्रतिष्ठानच्या सहकार्याने आणि देवगड रक्तमित्र परिवारचे सक्रिय सदस्य ॲड प्रसाद करंदीकर पुढाकारामुळे शिबिर यशस्वी झाले. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा वेदांग व पत्नी श्रृती प्रसाद करंदीकर यांनी उध्दवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त च्या देवगड येथील शिबिरात रक्तदान केले होते. पोंभूर्ले गावाचे उपसरपंच सादिक डोंगरकर, इतर ग्रामपंचायत सदस्य,उद्योजक संदीप कांबळे, पोंभूर्ले ग्रामस्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्वच जणांचे खुप खुप आभार.