Kokan: धमकी दमबाजीला मी भीक घालत नाही – मंत्री उदय सामंत

0
62
रत्नागिरी-सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा
धमकी दमबाजीला मी भीक घालत नाही - मंत्री उदय सामंत

रत्नागिरी दम दिला, धमकी दिली असे ज्या अदखलपात्र नेत्याने म्हटले आहे त्याला सांगू इच्छितो की, मी धमकी, दम याला घाबरणारा नेता नाही. हे ज्यांनी सांगितलं त्याच पक्षाच्या नेत्यांनी पुण्यामध्ये माझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. तरी मी डगमगलो नाही. परंतु ज्यांची अस्तित्वाची लढाई आहे, त्यांनी अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घेण्याची काहीही आवश्यकता नाही. हा आमचा आपसातील मामला असून आम्ही काय असेल ते आपापसात ठरवू. https://sindhudurgsamachar.in/kokan-पत्रकार-दत्तप्रसाद-पेडण-2/

आमच्यामध्ये कोणालाही लुडबुड करण्याची आवश्यकता नाही. जसं मी कोणाच्या पक्षांमध्ये लुडबुड करत नाही, तसं माझ्या पक्षामध्ये कोणी लुडबुड करू नये, असे मंत्री सामंत म्हणाले. सामंत पुढे म्हणाले की महायुतीतर्फे कोण उमेदवार द्यायचा, कधी घोषित करायचा, हे महायुती ठरवेल. काल देखील मी सिंधुदुर्गात नारायणराव राणे यांची भेट घेतली. ती माझी वैयक्तिक भेट होती. काल तेथे समन्वय समितीची बैठक होती आणि त्या समन्वय समितीच्या बैठकीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो. माझी दुसरी एक बैठक मुंबईला होती. त्यामुळे त्यावेळी मी नारायणराव राणे यांना भेटलो तर कोणाला एवढा पोटशूळ होण्याचे कारण काय, असा सवाल उदय सामंत यांनी यावेळी केला. त्यामुळे ज्यांनी स्वतःचा पराभव निश्चित केला आहे त्यांनी आमच्यावर अजिबात टीका करण्याची गरज नाही आणि आमच्या उमेदवारी बाबत दखल घेण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, आज मी रत्नागिरी येथे आलो त्यावेळी मला हे कळलं की या ठिकाणी आज आमचे सगळे पदाधिकारी जमणार आहेत आणि तुमच्या पत्रकार परिषदेमधून वेळ काढून मी त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मी जाणार आहे परंतु ती आता बैठक राहिलेली नाही तर ती आता एक जाहीर सभा झालेली आहे. त्यामुळे कोणीही असं समजू नये की कुणाची ताकद कमी आहे, कोणाची ताकद जास्त आहे. याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला महायुतीचा उमेदवार पुढे न्यायचा आहे. आम्ही काही उमेदवारीबाबतचा दावा सोडलेला नाही आणि तो दावा का आहे याची कारणे देखील मी अनेक वेळा सांगितलेली आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्यामध्ये ताकदच उरलेली नाही अशा लोकांनी सल्ले देण्याची अजिबात गरज नाही. मंत्री उदय सामंत म्हणाले…. निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा या महायुती जिंकणार आहे, वाशिम, हिंगोली, यवतमाळ या मतदारसंघांमध्ये महायुतीने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरले. रत्नागिरी तिसऱ्या टप्प्यात आहे. १९ एप्रिलपर्यंत उमेदवार ठरवायला वेळ आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शिवसेनेला उमेदवारी मिळावी याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशीही चर्चा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here