वेंगुर्ला प्रतिनिधी- शासनातर्फे गोरगरीब जनतेला मोफत धान्य पुरविण्यात येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आडेली येथील धान्य दुकानात धान्य वितरणावेळी तांदूळच्या पोत्यामध्ये चायनिजसदृश्य पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत याची शासनस्तरावरून त्वरित चौकशी होऊन संबंधित धान्य पुरवठादारावर कारवाई व्हावी, अशी मागणी आडेली सोसायटीचे चेअरमन प्रकाश गडेकर यांनी केली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-बॅ-खर्डेकर-महाविद्यालया/
आडेली येथील धान्य दुकानावर धान्य वितरण सुरु असताना तांदळाच्या पोत्यामध्ये प्लास्टिक पिशवीत चायनीज सदृश्य पदार्थ असल्याचे मापारी व सेल्समन यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित सचिव मोरेश्वर कांबळी व सोसायटी चेअरमन प्रकाश गडेकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पकाश गडेकर यांनी वेंगुर्ला पुरवठा विभागाच्या अधिका-यांना माहिती दिली. तसेच या तांदूळ पोत्यामध्ये किडे व अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थातून नाराजी व्यक्त करण्यात आली.
फोटोओळी – आडेली येथील धान्य दुकानात तांदुळाच्या पोत्यात चायनीजसदृश्य पदार्थ आढळून आले.