वेंगुर्ला प्रतिनिधी– नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.यात शहर परिसरातील शाळांतील पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी ‘माझा आवडता मित्र‘ यावर ३० डिसेंबर रोजी सायं. ४ वाजता लक्ष्मी नारायण शेणई वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम तीन विजेत्यांना १००, ७५ व ५० अशी रोख बक्षिसे देण्यात येतील. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-स्टार-स्पोर्ट्सच्या-प्/
दि.६ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता पं.जनार्दन शास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा घेण्यात येईल. यात पाचवी ते सातवी गटासाठी १ ते १५ मनाचे श्लोक पठण तर आठवी ते दहावी गटासाठी ज्ञानेश्वरी अध्याय बारावा पहिल्या १ ते १५ ओव्या पठण करावयाच्या आहेत. दोन्ही गटातील प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे ३००, २५०, २०० व १२५ ची दोन अशी बक्षिस ठेवण्यात आली आहेत. एका शाळेतून प्रत्येक गटात जास्तीत जास्त ३ स्पर्धकांना सहभाग दिला जाईल.
वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भालचंद्र शंकरराव कर्पे स्मरणार्थ स्मृती सुगम संगीत स्पर्धा होणार आहेत. यात पाचवी ते सातवीतील गटासाठी अभंग गायन व आठवी ते दहावी गटासाठी भक्तिगीत गायन स्पर्धा होईल. प्रत्येक गटातील विजेत्या प्रथम ५ क्रमांकांना अनुक्रमे रु.२५०, २००, १५० आणि १००ची दोन अशी रोख रक्कमेची पारितोषिक देण्यात येतील.
सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धे अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘युगनायक स्वामी विवेकानंद‘ यावर स्पर्धकांनी १० मिनिटे तर वेंगुर्ला तालुक्यातील आठवी ते बारावीतील फक्त विद्यार्थीनींकरीता ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची सामाजिक समरसता‘ यावर १० मिनिटे बोलावयाचे आहे. वरील दोन्ही स्पर्धा रविवार दि. ७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नगरवाचनालय संस्थेच्या सभागृहात होणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम ५ विजेत्यांना ५००, ३००, २५०, १५० व १०० याप्रमाणे विनायक पार्सेकर व जयवंती विनायक पार्सेकर स्मरणार्थ पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.
वेंगुर्ला तालुक्यातील विद्यालयांनी प्रत्येक गटातील २ स्पर्धकांची नावे १ जानेवारीपर्यंत पाठवावीत असे आवाहन नगर वाचनालय संस्थेचे कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.