सावंतवाडी-: निरवडे येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत विठ्ठल रखुमाई भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर गोठण भजन मंडळ वजराठ यांनी द्वितीय क्रमांक तर कडावल येथील स्वरसाधना संगीत भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. हा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ही स्पर्धा श्री देव भूतनाथ कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून श्रावणमासा निमित्त घेण्यात आली होती.https://sindhudurgsamachar.in/kokan-श्री-देव-कुणकेश्वर-मंदिर/
उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे:-
उकृष्ट गायक – अर्थव होडावडेकर, उकृष्ट पखवाज – तुषार नागडे, उकृष्ट हार्मोनियम -काशिनाथ परब, उकृष्ट तबला – समिर धुरी, उकृष्ट कोरस – विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आंदुर्ले, उकृष्ट झांज -भावेश परब, शिस्तबद्ध संघ श्री देवी सातेरी भजन मंडळ मांतोड यांनी मिळविला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्ञानदेव मेस्री व मनिष तांबोस्कर काम पाहिले. तर सूत्रसंचालन संदिप दळवी यांनी केले.