दापोली- गेल्या काही वर्षांपासून घसरलेला मतदानाचा टक्का लक्षात घेऊन हा टक्का वाढावा यासाठी विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था मतदार जनजागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांचे प्रबोधन करीत आहेत. पंचायत समिती दापोली शिक्षण विभागानेही या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम तयार केले असून त्यांच्या माध्यमातून मतदारांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. https://sindhudurgsamachar.in/moscow-attak-रशियाची-राजधानी-मॉस्को/
गटशिक्षण अधिकारी तथा या अभियानाचे नोडल ऑफिसर अण्णासाहेब बळवंतराव, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, सहाय्यक नोडल ऑफिसर बळीराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक उदय गांधी, विजय भारदे, वैजन देवघरकर, विलास सागवेकर, संतोष सकपाळ, गणेश तांबिटकर, सुनंदा मळगे, संजीवनी लाडे, बाबू घाडीगांवकर, महेश गिम्हवणेकर, महेश शिंदे, संजय मेहता, राहुल राठोड, उजेर शेख, सुरेश पाटील आदी शिक्षकांनी मतदार प्रबोधनगीते, पथनाट्याची निर्मिती केली आहे. नुकतेच दापोली येथील सर विश्वेश्वरय्या सभागृह, आझाद मैदान येथे या कार्यक्रमांचे सादरीकरण करून शुभारंभ करण्यात आला. आता लोकसभा निवडणुकीपर्यंत दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाचे हे कलापथक दापोली तालुक्यात सर्वत्र फिरून मतदार जनजागृती व प्रबोधन करणार आहे.