Kokan: पत्रकारांचे कौतुक करावे तेवढेच कमी – दिलीप गिरप

0
112
पत्रकार
पत्रकारांचे कौतुक करावे तेवढेच कमी - दिलीप गिरप

वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रशासन आणि नागरीक यांच्यातील मधला दुवा म्हणजे पत्रकार होय. सामान्य नागरीकांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम पत्रकार करत असताना पत्रकारांना कोणच मने न दुखवता दोन्ही बाजूंचा समतोल राखून त्यांना पत्रकारीता करावी लागते. तसेच शासन लोकप्रतिनीधी यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करतात. लेखणीच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचत असतात. त्यामुळे पत्रकारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे मत माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-१००-व्या-अखिल-भारतीय-मरा/

वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे आज शनिवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा नावाने साजरा करण्यात येणारा पत्रकार दिन संघाच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे पपू परब, भाजपा युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, दिलीप परब, मारुती दोडशानट्टी, वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक, सदस्य दिपेश परब, वेंगुर्ला पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र मातोंडकर, योगेश तांडेल, भरत सातोस्कर, सचिव विनायक वारंग, किरातच्या संपादक सिमा मराठे आदी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पथमेश गुरव व वेंगुर्ला पत्रकार संघाचा पत्रकार संघाचा स्व. संजय मालवणकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार आदर्श पुरस्कार प्राप्त अजित राऊळ व स्व. अरुण काणेकर स्मृती पुरस्कार प्रदीप सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

फोटोओळी – भाजपातर्फे प्रथमेश गुरव व अजित राऊळ यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here