Kokan: पाट तेली वाडीतील रामचंद्र (बाळु)तेली यांचे मातीचे घर कोसळले!

0
28
मातीचे घर कोसळले!
पाट तेली वाडीतील रामचंद्र (बाळु)तेली यांचे मातीचे घर कोसळले! - -

आमदार वैभव नाईक यांची तात्काळ मदत!

कुडाळ /प्रतिनिधी- मुसळ धार पावसामुळे पाट तेलीवाडी येधील रामचंद्र उर्फ बाळु तेली यांचे मातीचे घर कोसळून भुईसपाट झाले या बाबतची माहिती शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर यांनी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ कळविली असता आमदार वैभव नाईक यांनी आर्थिक मदत करुन घरकुल योजनेतुन प्रस्ताव मंजूर करुन सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले – गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे रामचंद्र उर्फ बाळु तेली यांचे घर पुर्ण कोसळले असल्याने आज आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी घटना स्थळी जावून भेट दिली यावेळी आर्थिक मदत देऊन घर पुर्ण करुन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील याची ग्वाही देत श्री बंगे यांनी देऊन आमदार वैभव नाईक आपल आश्वासन पुर्णं करतील जनतेचे सेवक म्हणून ते आपल्या मतदार संघात काम करीत असल्याचे श्री बंगे यांनी सांगितले! https://sindhudurgsamachar.in/kokan-बांदा-रोटरी-क्लबच्या-प्र/

पाट शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर यांच्या सुचनेनुसार त्यांना तात्काळ सहकार्य आम नाईक यांनी देऊन त्यांच्या साठी वाटेल ते सहकार्य करण्याची ग्वाही श्री बंगे यांनी दिली यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर, कुडाळ शिवसेना नगरसेवक उदय मांजरेकर, युवा सेनेचे राजु गवंडे, युवा सेनेचे संदेश सावंत, शिवसेना एसटी कामगार शिवसेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, ग्रामपंचायत सदस्या सौ वैष्णवी शेगले, रामचंद्र तेली,पियुष तेली,गुरु तेली, अक्षय तेली आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here