Kokan: पाठांतर स्पर्धेत भार्गवी व वैभवी प्रथम

0
12
वेंगुर्ल्यात पाठांतर स्पर्धेत भार्गवी व वैभवी प्रथम
पाठांतर स्पर्धेत भार्गवी व वैभवी प्रथम

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला प्रतिनिधी –

नगर वाचनालय वेंगुर्ला संस्थेतर्फे स्व.पं.जनार्दनशास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा १५ डिसेंबर रोजी दोन गटात घेण्यात आली. यात भार्गवी यादव आणि वैभवी मांजरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-भारतीय-शेतक-यांना-आता-शे/

इ.५वी ते ७वी गटासाठी पसायदान हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-भार्गवी यादव (वेंगुर्ला हाय.), द्वितीय-माधव ओगले (वेंगुर्ला नं.२), तृतीय-वेदा कामत व चतुर्थ-नील पवार (वेंगुर्ला नं.१), पाचवा-अधिरा गोडकर (सरस्वती विद्या.आरवली) यांनी तर इ.८वी ते १०वी गटासाठी सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६व्यामधील १५ ओव्या हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-वैभवी मांजरेकर, द्वितीय-वेदिका कुडव, तृतीय-साक्षी मेस्त्री (सर्व सरस्वती विद्या.आरवली), चतुर्थ-गायत्री साधले व पाचवा-गौरांग नेरूरकर (दोन्ही न्यू इं.स्कूल.उभादांडा) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण माया परब व विठ्ठल करंगुटकर यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना १९ जानेवारी रोजी पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here