Kokan: पिंगुळी रेल्वे ब्रीज नजीक दुचाकी व आयशर टेम्पो अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

0
15
अपघाता,
पिंगुळी रेल्वे ब्रीज नजीक अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

जिल्हात आरोग्य यंत्रणापुरेशी सुसज्य नसल्याने गंभीर अपघात ग्रस्तांची गोव्यात पाटवणी..अशी आमच्या जिल्ह्याची अवस्था काही बोलण्या सारखे नाही आपलेच दात आपलेच ओठ

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ – वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी रेल्वे ब्रीज नजिक बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दुचाकी व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार हरेश संतोष नेरूरकर (वय 19, रा. नेरूर पंचशील नगर) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या समवेत मागे बसलेले प्रथमेश प्रकाश नेरूरकर (वय 27, रा. नेरूर पंचशीलनगर) व सुमित जाधव (वय 27, रा. नालासोपारा) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघांचीही प्रकृती गंभीर असून, कुडाळ ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी एकाला गोवा बांबोळी येथे तर दुस-याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्याच्या-महावितरण-कं/

हरेश हा मित्राची ज्युपीटर दुचाकी घेऊन, प्रथमेश व मित्र सुमित या दोघांना ट्रिपल सीट घेऊन पिंगुळीच्या दिशेने जात होता. प्रथमेश व सुमित हे दोघेही मुंबईला असतात. दोनच दिवसांपूर्वी ते गावी आले होते. पिंगुळी रेल्वेब्रीज आले असता मद्यपानाच्या धुंदीत जुपीटर चालक असलेल्या पुढील वाहनास ओअरटेक करण्याच्या नादात हरेशचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि समोरून येणा-या आयशर टेम्पोला चालकाच्या बाजूने दुचाकीची जोरदार धडक बसली. यात तिघेही रस्त्यावर पडले. जूपीटर गाडीचा पुर्णंता चकाचूर झाला येवढी जबरदस्त धडक बसली दारूच्या नशेत असलेले हे तीघे गंभीर जखमी झालेच शिवाय गाडीत बाळगलेल्या दारूच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थ विखूरले गेले. त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या 108 क्रमांक रूग्णवाहीकेने उपचारासाठी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हरेशचा तत्पूर्वीच जागीच मृत्यू झाला.

तर प्रथमेश व सुमीत या दोघांवर ग्रामीण रूग्णालयाततर प्रथमेश व सुमीत या दोघांवर ग्रामीण रूग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्यावर येथील रूग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी व ओरोस येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहीती मिळताच कुडाळ पोलिस ठाण्याचे अंमलदार दयानंद चव्हाण व एस.सी. वराडकर फार उशीरा पोचले तो पर्यंत फार उशीर झाला होता घटना स्थळी पंचयादी करण्यासाठी कोणी पंच मिळतात का याची वाट पाहत होते तो पर्यंत जखमी गोवा बांबूळी पोचले होते.असे तेथील उपस्थित जनतेने मिश्किलीनेतेचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here