वेंगुर्ला प्रतिनिधी – परुळे बाजार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रदिप प्रभू यांना सन 2023 चा कामगार नेते डॉ. दत्ता सामंत सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.श्री. प्रभू हे सहकार आणि सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असून त्यांना यापूर्वी शासन शेती पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2005 ते 2012 पर्यंत परुळे बाजार ग्रामपंचायतीचे सदस्य तर 2012 ते 2017 या काळात सरपंच म्हणून कार्यरत असताना ग्रामपंचायतीला राष्ट्रीय आणि राज्य पुरस्काराच्या रुपाने करोडो रुपयांची बक्षिसे मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोणाच्याही कुठच्याही अडचणीच्या वेळेस धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले प्रदिप प्रभू यांचे या पुरस्कारमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-दर्पणकार-आचार्य-बाळशा/
फोटो – प्रदिप प्रभू


