Kokan: प्रदिप सावंत व अजित राऊळ यांना पत्रकार पुरस्कार जाहीर

0
94
पत्रकार पुरस्कार
प्रदिप सावंत व अजित राऊळ यांना पत्रकार पुरस्कार जाहीर

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहिर करण्यात आले असून अरूण काणेकर स्मृति आदर्श पत्रकार पुरस्कार ‘दै. तरूण भारत‘चे प्रदिप सावंत यांना तर संजय मालवणकर स्मृति आदर्श पत्रकार पुरस्कार ‘कोकण संवाद‘चे अजित राऊळ यांना जाहिर करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रा-यरनाळकर-स्मृती-एकां/

वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाची बैठकी ३ जानेवारी रोजी पत्रकार संघाच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, सचिव विनायक वारंग, खजिनदार एस.एस.धुरी, के.जी.गावडे, भरत सातोस्कर, प्रदिप सावंत, प्रथमेश गुरव, अजय गडेकर आदी उपस्थित होते. या बैठकीवेळी जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल  दै.लोकमतचे प्रतिनिधी प्रथमेश गुरव यांचा तसेच मातोंड ग्रा.पं.निवडणुकीत सदस्य म्हणून विजयी झाल्याबद्दल दै.सकाळचे वेंगुर्ला प्रतिनिधी दिपेश परब यांचा सत्कार करण्यात आला. याच बैठकीत ओरोस येथे होणा-या पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी नियोजन करण्यात आले. पत्रकार संघाच्या सलग तीन बैठकांना अनुपस्थित राहणा-या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे ठरविण्यात आले. तसेच पत्रकार भविष्य निर्वाह निधीसाठी तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी यांची भेट घेण्याचे ठरले.

फोटो – प्रदिप सावंतअजित राऊळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here