⭐सत्ताधारी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय:पतसंस्था अध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी -: सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून ही अनियमितता कागदोपत्री न करता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संबधिताने सुमारे ४१ लाखांचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-मेडिकल-कॉलेज/
संशयिताकडून ४५ लाख वसूल करण्यात आले आहे. संस्थेच्या सीए मार्फत ऑडिट सुरू असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.