Kokan: प्रा.डी.आर.आरोलकर सेवानिवृत्त

0
73
सेवानिवृत्त, vengurla,
प्रा.डी.आर.आरोलकर सेवानिवृत्त

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.डी.आर.आरोलकर हे आपल्या नियत वयोमानानुसार ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या अध्यक्षतेखाली २ एप्रिल रोजी प्रा.आरोलकर यांचा महाविद्यालयातर्फे सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/kokan-नववर्षानिमित्त-काढलेली/

प्रा.वामन गावडे, प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा.डॉ.विलास देऊलकर, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.डि.बी.राणे, प्रा.डॉ.धनश्री पाटील, डॉ.व्ही.एम.पाटोळे, प्रा.एल.बी.नैताम,  प्रा.एस.टी. भेंडवडे,  प्रा.शशांक कोंडेकर, डॉ.आनंद बांदेकर, प्रा.सुरेखा देशपांडे, प्रा.दिलीप शितोळे यांनी प्रा.आरोलकर यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. डॉ.नेहा आरोलकर हिनेही मनोगत व्यक्त केले.

प्रा.आरोलकर यांनी शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांचे ऋण व्यक्त करून आपल्या वाटचालीत अनेकांनी आपल्याला सहकार्य केले. तसेच कुटुंबाची व मित्रपरिवाराची साथ लाभली त्यामुळेच आपण हा टप्पा पार पाडू शकलो असे सांगितले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.वामन गावडे यांनी तर आभार प्रा.एस.एस.दिक्षित यांनी मानले.

फोटोओळी – प्रा.डि.आर.आरोलकर यांचा महाविद्यालयातर्फे सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here