Kokan: बनावट GST नोटीस प्रकरणाची सखोल चौकशी करून तक्रारदाराला न्याय मिळवून द्या – आ. वैभव नाईक

0
75
बनावट जीएसटी नोटीस प्रकरणाची सखोल चौकशी करून तक्रारदाराला न्याय मिळवून द्या - आ. वैभव नाईक
बनावट जीएसटी नोटीस प्रकरणाची सखोल चौकशी करून तक्रारदाराला न्याय मिळवून द्या - आ. वैभव नाईक

आ. वैभव नाईक यांची वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

मालवण – मालवण मधील एका व्यापाऱ्याला सीए असलेल्या व्यक्तीने GST भरण्याची बनावट नोटीस काढून जीएसटी चलन भरण्यास लावले. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्या व्यापाऱ्याने सिंधुदुर्ग GST कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली. मात्र या प्रकरणातील जीएसटी सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला आणि आपल्या परिवारातील काहींना वाचविण्यासाठी जीएसटी विभागाकडून थेट तक्रारदारावरच छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेत-आजी-आजोब/

सदर व्यापाऱ्याला न्याय मिळावा अशी विनंती व्यापारी संघाचे सदस्य नितीन वाळके यांनी आ. वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ.वैभव नाईक यांनी आज वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची भेट घेत सदर प्रकरणाची त्यांना सविस्तर माहिती दिली. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर व संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली. ना अजित पवार यांनीही चौकशी करण्याचे मान्य केले आहे.

जिल्हयात बनावट नोटिसीबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली. नंतर मुंबई आणि कोल्हापूर विभागाकडून जीएसटी पथके नेमून सिंधुदुर्गात पाठविण्यात आली. सिंधुदुर्गात काहीजणांवर छापे टाकण्यात आले. यातील एका पथकाने थेट तक्रारदाराच्या घरी सिनेस्टाईल छापा टाकला. तक्रारदार घरी नसताना त्याच्या कुटुंबियांकडे घराची तपासणी करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. इतरही ठिकाणी तपासणी करण्याचा प्रयत्न पथकाकडून करण्यात आला. जीएसटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांना अशाप्रकारे त्रास देण्याचा. प्रयत्नही जिल्हयात करण्यात आला आहे. बनावट प्रकरणाबाबत ज्या व्यापाऱ्याने तक्रार करण्याचे धाडस दाखविले, त्यांच्याच घरी अधिकारी वर्गाकडून दमदाटी होणार असेल, तर यापुढे नागरिकांनी तक्रार कोणाकडे करावी हा प्रश्न असून याची सविस्तर माहिती आ. वैभव नाईक यांनी ना. अजित पवार यांना दिली आहे.याबाबत चौकशी करण्याचे ना. अजित पवार यांनी मान्य केले आहे अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here