Kokan : बांदा निमजगा शाळा मोडकळीस आल्याने शिवसेना पदाधिकारी आक्रमक

0
65
शिवसेना ,मशाल,उद्धव ठाकरे
मशाल कुणाची? उद्धव ठाकरे यांची की समता पार्टीची; आज ‘सर्वोच्च’ सुनावणी

शाळेत धडक देत विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना धरले धारेवर

बांदा ता.१२-: शहरातील निमजगा येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत हि मोडकळीस आली असून केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. जीर्ण इमारतीमुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने आज शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व पालक यांनी शाळेत धडक देत प्रशासनाला धारेवर धरले.

यावेळी विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर व केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी शाळेच्या इमारतीचे निरलेखन झाले असून येत्या आठ दिवसात काम सुरु होणार असल्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here