Kokan: बाबू घाडीगांवकर यांच्या लेखास प्रथम क्रमांक

0
20
बाबू घाडीगांवकर यांच्या लेखास प्रथम क्रमांक
बाबू घाडीगांवकर यांच्या लेखास प्रथम क्रमांक

दापोली- कोकणातील दर्जेदार व निर्भीड नियतकालिक असलेल्या साप्ताहिक कोकण मिडीयाच्या वतीने दरवर्षी एक विशिष्ट संकल्पना निश्चित करून दिवाळी विशेषांक प्रकाशित केला जातो. यंदाचा कोकण मिडीयाचा दहावा दिवाळी विशेषांक आहे. ‘कोकणातील ग्रामदैवते’ ही मध्यवर्ती कल्पना विचारात घेऊन कोकण मिडीयाच्या वतीने लेखकांसाठी ‘कोकणातील ग्रामदैवते’ विषयावर आधारित लेख व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

या स्पर्धेत कोकणातील प्रथितयश साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांनी लिहीलेल्या ‘चंद्रनगर येथील स्वयंभु श्री घाणेकरीन देवी’ या लेखास प्रथम क्रमांक मिळाला होता. नुकताच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लांजा येथील लोकमान्य टिळक नगर वाचनालयात आयोजित करण्यात आला होता. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते बाबू घाडीगांवकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लांजा-राजापूर संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक सुभाष लाड, ज्येष्ठ विधिज्ञ तथा साहित्यिक विलास कुवळेकर, कोकण मिडीयाचे संपादक प्रमोद कोनकर, लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष अभिजीत जेधे, बेर्डे, तसेच स्पर्धेचे परिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. रोख रक्कम, सन्मानपत्र आणि कोकण मिडीयाचा दिवाळी विशेषांक असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. संपूर्ण कोकणातून बाबू घाडीगांवकर यांच्या लेखास प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाल्याने चंद्रनगर तसेच दापोलीच्या साहित्य वर्तुळातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-हेमंत-सावंत-यांना-राष्ट्/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here