Kokan: बिहारचे राज्यपाल चक्क आरवली वेतोबाच्या दर्शनाला

0
20
श्री वेतोबा,बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर
बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी कुटुंबासमवेत श्री वेतोबाचे दर्शन घेतले.

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /वेंगुर्ला /प्रतिनिधी

बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सपत्नीक कोकणचा तिरूपती म्हणून ओळख असलेल्या वेंगुर्ला-आरवली येथील श्री देव वेतोबा, वैष्णोदेवी सातेरी चरणी लीन होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
मी मूळचा आरवली येथील रहिवासी आहे. मात्र माझे वास्तव्य गोवा राज्यात असते. जत्रोत्सवाला मला यायला मिळाले नसल्याने मी आज कुटुंबासमवेत श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले असल्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. देवस्थानतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, विश्वस्त डॉ.प्रसाद प्रभूसाळगांवकर, मयूर आरोलकर, उमेश मेस्त्री, उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-आंब्रड-कसाल-पावशी-विभाग/
फोटोओळी – बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी कुटुंबासमवेत श्री वेतोबाचे दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here