Kokan: बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे निवासी शिबिर १८ पासून

0
61
बॅ.खर्डेकर महाविद्यालय,बॅ.खर्डेकर स्मृतिदिन
बॅ.खर्डेकर स्मृतिदिन २६ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला प्रतिनिधी– बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सोमवार दि.१८ ते २४ डिसेंबर या कालावधीत ‘युवकांचा ध्यास ः ग्राम शहर विकास‘ या संकल्पनेवर आधारीत सात दिवसांचे निवासी शिबिर वेंगुर्ला-परबवाडा येथे आयोजित केले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-म्हापण-मतदार-संघातील-कोट

 दि.१८ रोजी दुपारी ३ वाजता मुख्याधिकारी परितोष कंकाळ आणि सरपंच शमिका बांदेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, उपसरपंच विष्णू परब, सदस्य हेमंत गावडे, कार्तिकी पवार, अरूणा गवंडे, कृष्णाजी सावंत, स्वरा देसाई, सुहिता हळदणकर आदी उपस्थित राहणार आहेत. प्रार्थना, गटचर्चा, व्यायाम, श्रमदान, चर्चासत्र, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच दि.१९ रोजी ४ वा. ‘सुदृढ युवा, सुदृढ देश‘ यावर डॉ. सुप्रिया रावळ, दि. २० रोजी ३ वा.  ‘युवापिढीसाठी रोजगाराच्या संधी‘ यावर, ४ वा. ‘कृषी योजनांची माहिती‘ यावर जीवन परब, दि.२१ रोजी ३ वा. ‘सिधुदुर्गचे वैभव आणि भारतीय पाकोळी (पर्यावरण) यावर धनुशा कवलकर, ४ वा. ‘स्वच्छता हिच सेवा‘ यावर सुनिल रेडकर, दि. २२ रोजी ३ वा.  ‘सेंद्रिय शेती‘ यावर अजित परब,  ४ वा. ‘बालकांच्या समस्या व उपाय‘  यावर मिलिद कांबळे, दि. २३ रोजी ३ वा.  ‘विविध कौशल्ये आत्मसात करणे‘ यावर वैद्य सुविनय दामले, ४ वा. ‘गुन्हेगारी व त्यावरील कायदे‘ यावर अॅड. चैतन्य दळवी हे मार्गदर्शन करणार आहेत. दि. २४ रोजी शिबिराचा समारोप होणार आहे. तरी या शिबिराला भेट देऊन शिबिरार्थींना प्रोत्साहीत करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here