Kokan: बॅ.खर्डेकर यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व आत्मसात करा – अॅड.गोडकर

0
38
बॅ.खर्डेकर यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व आत्मसात करा-अॅड.गोडकर
बॅ.खर्डेकर यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व आत्मसात करा-अॅड.गोडकर

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर हे अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील असणारे प्रभूत्व विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अॅड.नारायण उर्फ श्याम गोडकर यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वाळू-शिल्पातून-नाताळच्य/

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे संस्थापक व प्रथम पाचार्य बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ६० वा स्मृतिदिन कार्यक्रम प्राचार्य डॉ.एम.बी. चौगले यांच्या अध्यक्षतेखाली २६ डिसेंबर रोजी महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर अॅड.श्याम गोडकर, बॅ.खर्डेकर स्मृतिदिनाचे चेअरमन प्रा.वामन गावडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिलिप शितोळे, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र खामकर, विद्यार्थी सचिव फाल्गुनी नार्वेकर उपस्थित होते. संपूर्ण ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास करणारे बॅ.खर्डेकर यांना अभिप्रेत असणा-या नवव्या अध्यायातील वचन पूर्ण करण्याचे आणि ज्ञानेश्वरीच्या तत्त्वविचारांकडे लक्ष द्यावे असे आवाहन प्राचार्य चौगले यांनी केले.

या कार्यक्रमात इंग्रजी विभागामार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील सानिया वराडकर, सानिया गावडे, योजना नवार, फाल्गुनी नार्वेकर, सोनाली चेंदवणकर यांना गौरविण्यात आले. तर प्रमुख पाहुणे अॅड.गोडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. 

 बॅ.खर्डेकर स्मृतिदिन कार्यक्रमाला बाबली वायंगणकर, नंदन वेंगुर्लेकर, अशोक दाभोलकर, मिताली होडावडेकर, आनंद बांदेकर, प्रदिप होडावडेकर, सुरेंद्र चव्हाण, हरी आळवे, वामन धुरी, प्रदिप परब, अशोक सावळे, प्रदिप बोवलेकर, महादेव करंगळे, संजय पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन संपदा दिक्षित यांनी, मान्यवर परिचय डॉ.वसंतराव पाटोळे तर आभार पर्यवेक्षक दिलीप शितोळे यांनी मानले.

फोटोओळी – इंग्रजी विभागामार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना अॅड.गोडकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here