Kokan: मदन हजेरी भूषविणार बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

0
83
बालकुमार साहित्य संमेलन,
प्रसिद्ध लेखक, संपादक, प्रकाशक मदन हजेरी भूषविणार बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

वेंगुर्ला प्रतिनिधी- तुळस येथे होणा-या बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध लेखक, संपादक, प्रकाशक मदन हजेरी हे भूषविणार आहेत. तर बालनाट्य लेखकक व दिग्दर्शक प्रकाश पारिख हे ‘लेखक आपल्या भेटीला‘ या कार्यक्रमातून मुलांशी संवाद साधणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-बॅ-खर्डेकर-महाविद्यालया-2/

 येथील आनंदायत्री वाङ्मय मंडळातर्फे २२ व २३ डिसेंबर या कालावधीत तुळस गावामध्ये बालकुमार मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. मदन हजेरी यांनी यापूर्वी अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या पुस्तकांना राज्यशासनाचे अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. बालवाङ्मयातील अनेक पुस्तकांचे त्यांनी मराठीत अनुवाद केले आहेत. अनुभवी व मुलांसाठी साहित्य विश्वात झोकून देऊन कार्य करणारे  हजेरी हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर प्रकाश पारिख हे अनेक वर्षे मुलांसाठी नाट्यशिबिरे भरवित आहेत. राज्यशासनाने त्यांच्या सेवेचा पुरस्काराने सन्मान केला असून ते ‘लेखक आपल्या भेटीला‘ या कार्यक्रमातून मुलांशी संवाद साधणार आहेत.

फोटो – मदन हजेरी, प्रकाश पारिख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here