🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l रत्नागिरी-
महामार्गाच्या कामास उशीर झाल्याने ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत या कामात दिरंगाई झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिली. ते रत्नागिरीत येथे आढावा बैठकीसाठी आले होते .https://sindhudurgsamachar.in/kokan-प्राचीन-कोकण-म्युझियममध/
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीची माहिती खासदार राणे यांनी दिली. राजापूर येथील अर्जुना नदीतील गाळ काढणे, मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण काम, चिपळूण पूरहानी तसेच वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याबद्दल, जयगड येथील जिंदल कंपनीतील वायूगळतीमुळे विद्यार्थ्यांना झालेला त्रास अशा विषयांमध्ये काय कारवाई करण्यात आली, याची माहिती विचारताना खासदार राणे यांनी चिपळूण विमानतळाबाबत जागा संपादित केली आहे का, याचाही आढावा घेतला.