Kokan: महामार्गावर प्राण्यांच्या वर्दळीच्या ठिकाणी animal crossings आणि green corridor बनवणं गरजेचं

0
14
animal crossings आणि green corridor बनवणं गरजेचं
मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा animal crossings आणि green corridor बनवणं गरजेचं

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – सिंधुदुर्गातील जंगलां मधून लांडगे जवळजवळ नामशेष झालेत. कोल्ह्याची संख्या पण कमी होत चाललीय अस चित्र असताना हुमरमळा मधून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा अणाव आणि डिगसच जंगली भाग लागतो आहे. ह्याच ठकाणी महामार्गालगद च्या जवळूनच नदी वाहत असल्याने ह्या रस्त्या वरून रात्रीच्यावेळी जंगली प्राण्यांची वर्दळ असते. त्या मुळे या भागात बिबटा, कासव, फटकुरे, कांडेचोर, जंगली मांजर, अनेक प्रकारचे साप अपघातात मारले जात आढळत आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-आंतरशालेय-राष्ट्रीय-करा/

गेल्या उन्हाळ्यात देखील कोल्ह्याची पिल्ले मारली गेली होती. त्यामुळे पट्टेरी वाघाचा अपघात झाल्यावरच वनविभाग याची दखल घेणार आहे काय ? रस्ते देश आणि प्रदेशाला समृध्द करते त्यामुळे प्रगती महत्त्वाची आहेच, पण हे सगळ करत असताना पर्यावरणाची काळजी घेणं पण तेवढच महत्त्वाचं आहे. हे सर्व प्राणी निसर्गाचं संतुलन राखायला मदत करतात. त्यांचा अपघाती मृत्यू होऊ नये ह्या साठी या भागात महामार्गावर प्राण्यांच्या वर्दळीच्या ठिकाणी प्राणि क्राॅसिंग animal crossings आणि green – corridor बनवणं गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here