Kokan: महाविकास आघाडीच्या सात नगरसेवकांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश..

0
14
महाविकास आघाडीच्या सात नगरसेवकांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश..
महाविकास आघाडीच्या सात नगरसेवकांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश..

कुडाळात उबाठा शिवसेना गटाचे माजी आमदार वैभव नाईक व काँग्रेसचे अभय शिरसाट यांना जोरदार फटकाकुडाळ नगरपंचायतीत आता उरला फक्त उबाठाचा एकच नगरसेवक

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ प्रतिनिधी-:-

कुडाळमध्ये महविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ५ नगरसेवक व काँग्रेसचे २ नगरसेवक असे एकूण ७ नगरसेवकांनी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे उध्दव ठाकरेंसह माजी आमदार वैभव नाईक व काँग्रेसचे अभय शिरसाट यांना जोरदार धक्का बसला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-पिंगुळी-रेल्वे-ब्रीज-नजी/

कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचीच सत्ता गेली पाऊणे तीन वर्षे होती. मात्र अचानक गेल्या काही दिवसांपुर्वी कुडाळ नगरपंचायतीच्या “नगराध्यक्ष”पदी सत्ता बदल झाला.उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची एक नगरसेविका सौ.श्रुती राकेश वर्दम यांनी भाजपच्या नगरसेविका सौ.प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांना साथ दिल्याने सौ.प्राजक्ता बांदेकर या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या होत्या. आता मात्र महाविकास आघाडीच्या ७ नगरसेवकांनीही भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.मात्र एक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिला आहेत.

आज ओरोस येथे भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक किरण शिंदे,नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सौ.सई काळप,नगरसेविका सौ.ज्योती जळवी,नगरसेविका सौ.श्रेया गवंडे व काँग्रेसच्या नगरसेविका सौ.आफ्रिन करोल ,नगरसेविका सौ.अक्षता खटावकर या ७ नगरसेवकांनी आज भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.तर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे एक नगरसेवक मंदार शिरसाट हे मात्र उध्दव ठाकरेंसोबतच राहिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here