Kokan: महिला उत्कर्ष समितीच्या मेळाव्यास उदंड प्रतिसाद

0
78
महिला उत्कर्ष समिती,
महिला उत्कर्ष समितीच्या मेळाव्यास उदंड प्रतिसाद

कुडाळ/ प्रतिनिधी – आजच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे येणे गरजेचे आहे . कला क्रीडा समाजसेवा उद्योग, राजकारण क्षेत्रातही स्त्रियांनी प्रगती साधने गरजेचे आहे. पुढे जाणाऱ्या सर्व महिलांच्या मागे महिला उत्कर्ष समिती ठामपणे राहणार असून समाजातील अशा सर्व महिलांना योग्य ते सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन ओरस येथे बोलताना महिला उत्कर्ष समितीच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ ज्योतिका ताई हरियाण यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-कणकवली-उपजिल्हा-रुग्णाल/

कोकण विभाग अध्यक्ष सौ. ज्योतिका हरयाण आणि सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ. दीपा ताटे यांच्या उपस्थितीत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनानिमित्त महीला उत्कर्ष समितीच्या वतीने
महिला मेळाव्याचे आयोजन कुडाळ तालुक्यात रवळनाथ मंदिर ओरोस येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महिलांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद लाभला. यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष दीपाताई ताटे म्हणाल्यात आजच्या या युगात महिला सक्षम झाल्या पाहिजेत संपूर्ण जिल्ह्यातील सर्व महिलांच्या मागे आमची समिती ठामपणे उभी असून तळागाळातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेणार आहे आजच्या या जागतिक महिला मेळाव्यातून अशा सर्व महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा आमच्या या सर्व समितीचा आणि सर्व सदस्यांचा प्रयत्न राहील.

उपस्थित महिलांना महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आणि आपल्या समितीची ध्येयधोरण समजावून सांगितली आणि सर्वांनी आमच्या या समितीमध्ये सहभागी व्हा असे आवाहन केले. त्याचवेळी या कार्यक्रमांमध्ये रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आलं होतं. २० रक्तदात्यांनी रक्तदान केलं. त्यानंतर दुपारी दोन नंतर पाककला स्पर्धा आयोजित केली गेली. रानभाज्यांपासून पाककला तयार करणे. अशाप्रकारे कार्यक्रमाचं स्वरूप होतं. कोकण विभाग जंगल व हिरवाईने नटलेला प्रदेश आहे. तसेच या विभागामध्ये वर्षभर रानभाज्या उपलब्ध असतात. या भाज्या शरीरस्वास्थ्याला फायदेशीर ठरत असल्यामुळे त्याची महती जनमानसात पोहोचावी व त्यांचा खाण्याकडे कल वाढावा यासाठी रानभाज्यांपासून पाककृती सादर करणे अशा प्रकारची स्पर्धा भरवण्यात आली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती बनवण्यात आल्या होत्या. त्याचा मनसोक्त आनंद उपस्थितांनी घेतला. त्या कार्यक्रमांमध्ये १५ महिलांनी सहभाग घेतला होता तर प्रथम क्रमांक रिया गणेश चव्हाण, द्वितीय क्रमांक वंदना अजय ओरसकर ,तृतीय क्रमांक मनश्री महेश पवार यांनी पारितोषिक पटकावली.

संध्याकाळी पाच नंतर महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये ६० महिलांनी सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ खेळून ही स्पर्धा खेळली गेली होती. त्यामुळे उपस्थितांची मन जिंकली गेली होती. या स्पर्धेमध्येत प्रथम क्रमांक मानसी महादेव परब, द्वितीय क्रमांक उत्कर्षा उमेश पवार,तृतीय क्रमांक नम्रता नाईक यांनी पारितोषिकं पटकावली. या सर्वांचे कोकण विभाग अध्यक्ष ज्योतिका हरयाण आणि जिल्हाध्यक्ष दीपा ताटे यांनी अभिनंदन केलं तसेच पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.या सर्व कार्यक्रमाचं आयोजन कुडाळ तालुकाध्यक्ष तन्वी सावंत आणि सचिव नेहा परब, उपाध्यक्ष सुस्मिता राणे सदस्य दीपा चव्हाण, दीप्ती चव्हाण, रूपाली वरक यांनी केलं होतं. कुडाळ तालुकाध्यक्ष तन्वी सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here