⭐१५ दिवसाच्या मोजक्या कालावधीत महिला सर्व कागदपत्रे जमा करु शकत नाहीत यासाठी काही प्रमुख मागण्या घेऊन.मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण या सामाजिक संस्थेने मालवणच्या विद्यमान तहसिलदार मा. वर्षा झालटे मॅडम यांना निवेदन
मालवण -१ जुलै, महिलांच्या सन्मानासाठी, महिला हकासाठी, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना. मुख्यमंत्री, माझी लाडकी बहिण योजना लागू केली जात आहे.यासाठी महिलांच्या
आधार लिंक केलेल्या बँक अकाउंट मध्ये दरमहा १५०० जमा केले जाणार अशी माहिती प्रसारित झालेली आहे. यासाठी लाभार्थ्यांना, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, कुटुंब प्रमुख उत्पन्न दाखला, बँक पास बुक, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड. अशी कागद पत्रे आहेत.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पुणे-मुंबई-शिवनेरी-प्रव/
पण ही योजना अधिक प्रभावी आणि तत्परतेने लागू होण्यासाठी कालावधी १५ दिवसांचा आहे. या कालावधीत महिला सर्व कागदपत्रे जमा करु शकत नाहीत यासाठी काही प्रमुख मागण्या घेऊन.मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण या सामाजिक संस्थेने मालवणच्या विद्यमान तहसिलदार मा. वर्षा झालटे मॅडम यांना निवेदन सादर केले.
यावेळी तहसिलदार बरोबर नायब तहसिलदार मा. गंगाराम कोकरे साहेब पण उपस्थीत होते.
मातृत्वचे, दादा वेंगुर्लेकर, कु. दीक्षा लूडबे, ममता तळगावकर, सुनीता वाला वलकर, सारिका हडकर, छाया लुडबे, श्री. सचिन मातोंडकर आणि अन्य उपस्थीत होते.
या योजनेच्या लाभासाठी मातृत्व आधार मदत करेल असे सांगण्यात आले.