Kokan: मानसकोंड येथील 26 वर्षीय विवाहितेचा विंचू दंशाने मृत्यू

0
20
scorpian bite,
मानसकोंड येथील 26 वर्षीय विवाहितेचा विंचू दंशाने मृत्यू

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार / रत्नागिरी

संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथील 26 वर्षीय विवाहितेचा विंचू दंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवार 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. मंजिरी वैभव फेपडे (26, मानसकोंड, फेपडेवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या जाण्याने ऐन भाऊबीजेलाच मानसकोंड गावावर शोककळा पसरली आहे. त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-विधानसभा-निवडणुकीतून-7-जण/

याबाबत सविस्तर वृत्त असे की, – मंजिरी ही घराच्या मागच्या पडवीच्या पायरीवर बसलेली असताना शुकवारी सायंकाळी 5 वाजता तिला विंचू दंश झाला. तिला ९ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिला अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरानी तिला कोल्हापूर येथे हलवण्यास सांगितले. कोल्हापूर येथे उपचारासाठी नेताना रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मंजिरी यांचे मानसकोंड येथेच माहेर, सासर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here