वेंगुर्ला प्रतिनिधी- येथील श्री सातेरी व्यायाम शाळेच्या २९व्या वर्धापनदिनानिमित्त साई दरबार हॉल येथे ३० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मानाची तिसरी ‘सिधुदुर्ग क्लासिक २०२३‘ ही शरिरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेत मालवणचा प्रितम शिदे हा ‘सिधुदुर्ग क्लासिक २०२३‘चा मानकरी ठरला. कै. लक्ष्मी देवजी स्मरणार्थ रामचंद्र देवजी पुरस्कृत भव्य मानाचा हनुमान चषक व रोख रक्कम, मानाचा किताब, प्रमाणपत्र, एच २ ओ कंपनी किशोर नारकर पुरस्कृत भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/kokan-प्राचार्य-सिद्धार्थ-तां/
ही स्पर्धा वेंगुर्ला तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाने, सिधुदुर्ग बॉड बिर्ल्डा असोसिएशनच्या मान्यतेने, युवक शरिरसौष्ठव संस्थेच्या सहकार्याने सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला विद्यार्थी मित्रमंडळाने आयोजित केली होती. उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांनी केले. यावेळी जयप्रकाश चमणकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय मोरे, विजय तांडेल, शिवसेना तालुका अध्यक्ष नितीन मांजरेकर, शहर अध्यक्ष उमेश येरम, आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू किशोर सोनसूरकर, संतोष परब, रामचंद्र देवजी, पत्रकार सुरेश कौलगेकर, खानोलकर सर, अबोली सोनसुरकर, अमोल तांडेल, दादा पेडणेकर, विजय फेंद्रे, अॅड.मनीष सातार्डेकर, शैलेश केसरकर, हेमंत चव्हाण, साक्षी वंजारी, विलास नाईक, विनय धूरत आदी उपस्थित होते.
स्पर्धेत सातेरी व्यायामशाळेचा चंदन कुबल हा बेस्ट पोझर, अंकित सोनसुरकर हा मोस्टइम्पोवेड बॉडी बिल्डर तर विनय धूरत पुरस्कृत बेस्ट लोवर बॉडी पारितोषक बेस्ट जोकर फिटनेस सावंतवाडीचा आनंद राऊळ ठरला. अंतिम निकाल यामध्ये ५५ किलो आतील प्रथम- हरीश रजपूत (कुडाळ), द्वितीय-अतुल दिकवलकर (कणकवली), तृतीय- चंदन कुबल (वेंगुर्ला), चतुर्थ-योगेश केरकर (वेंगुर्ला), पाचवा-रुपेश वंजारी (कणकवली),
६० ते ६५ किलोमध्ये प्रथम-आनंद राऊळ (सावंतवाडी), द्वितीय- शंकर माने (कणकवली), तृतीय-शेर बहादुर बोगती (सावंतवाडी), चतुर्थ- मेघःश्याम धुरी (वेंगुर्ला), पाचवा-सहिल भिडीये (नांदगाव), ६० ते ६५ किलो गटात प्रथम-सहदेव नार्वेकर (शिरोडा), द्वितीय-ज्ञानेश्वर आळवे (कुडाळ), तृतीय-रितेश केळुस्कर (मालवण), ७० ते ७५ किलो गटात प्रथम-प्रितम शिंदे (मालवण), द्वितीय-कौस्तुभ वर्दंम (नांदगाव), ७५ किलो वरील गटात प्रथम – अंकित सोनसुरकर (वेंगुर्ला), द्वितीय-गितेश चव्हाण (मालवण), तृतीय-क्रमांक आर्यन धारपवार (सावंतवाडी) याने पटकाविला. स्पर्धेला पंच म्हणून विजय मोरे, अमोल तांडेल, हेमंत नाईक, विक्रांत गाड, सुधीर हळदणकर यांनी काम पाहिले.
फोटोओळी – शरिरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.


