सौ. श्रध्दादेवी भोसले: पालकांनी आपल्या पाल्यांबाबत क्षमतांचा विचार करूनच आवडणाऱ्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे
बांदा ता.११-: आधुनिक तंत्रज्ञानाने सगळ्याच घटकांना व्यापलेल आहे. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील मुलांच्या अनेक समस्या या मोबाईलमुळे निर्माण झालेल्या आहेत. याचे गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आणि शरिरिक आरोग्यावर होत असून मोबाईलचा दुरुपयोग केल्यामुळे अनेक सामाजिक समस्या, सायबर क्राईम अशा घटनाना अनेक पालकांना सामोर जाव लागत आहे. यासाठी मुलांचे भावविश्व समजावून घेऊन त्यांचे मित्र बनून संवाद साधल्यास अनेक समस्या दुर होवू शकतात असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी सौ. श्रध्दादेवी भोसले यांनी येथे केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-पिक-विम्याच्या-रक्कमेसा/