Kokan: मी महिन्यातून दोन वेळा रत्नागिरीत येणार असून नियोजन करुन काम करुया – खासदार नारायण राणे

0
33
खासदार नारायण राणे
मी महिन्यातून दोन वेळा रत्नागिरीत येणार असून नियोजन करुन काम करुया- खासदार नारायण राणे

रत्नागिरी- आज सर्वांना भेटून आनंद झाला, जातीचे राजकारण मी कधी केले नाही. माझ्या विजयाचे मानकरी तुम्ही आहात. नामदार रवींद्र चव्हाण, नामदार उदय सामंत यांचे माझ्या निवडणुकीत मोठे योगदान राहिले. माजी खासदार निलेश राणे यांनी मेहनत घेतली. रत्नागिरी जिल्हा सुजलाम, सुफलाम करणार आहे. ज्यांनी माझे काम केले त्यांना आनंद वाटला, ज्यांनी नाही केले त्यांना आज पश्चाताप होत असेल, असे खासदार नारायण राणे गौरव समारंभात बोलताना म्हणाले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुख्यमंत्री-युवा-कार्य/

मी खासदार उपद्रवकरीता नाही पण कोणी नागरिकांना त्रास देईल त्यांना सोडणार नाही. आजपासूनच मस्ती बंद असा इशाराही त्यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे.
अतिवृष्टीची पाहणी केली आणि प्रशासनाला आदेश दिल्याने त्यांनी कामांना सुरुवात केली आहे. चिपळूणचा गाळ प्रश्न आणि हायवे प्रश्न सोडवणार असल्याचे ते म्हणाले. प्रगती करुनच दाखवणार असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

नामदार राणे म्हणाले महिन्यातून दोन वेळा रत्नागिरीत येणार असून नियोजन करुन काम करुया. मागील खासदारांने काही केले नाही. रत्नागिरीत पाणी किती वाया जाते, त्याचा उपयोग का केला नाही? असा ठोस प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी बारसु रिफायनरीबाबत सांगितले की रिफायनरीला का विरोध? कोणाच्या घरात राक्षस जन्माला आला. खोट्या अफवा पसरवल्या गेल्या. पण मी सांगतो, रिफायनरीमुळे अनेक जणांना फायदा होईल. मुलं शिकली पाहिजेत, त्यांची प्रगती झाली पाहिजे. असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here