Kokan : मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांचा त्वरीत निपटारा करण्याच्या सूचना – कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

0
24
कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर .jpeg

नवी मुंबई: कोकण विभागातील नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, प्रशासनात लोकाभिमुखता यावी, कारभार पारदर्शक व्हावा या उद्देशाने कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आलेले मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.

या कक्षात मुख्यमंत्र्यांना उद्देशून असलेले अर्ज, निवेदन, तक्रार स्वीकारण्यात येतील. तसेच संबंधितांना पोहच पावती दिली जाईल. त्याचबरोबर आलेली तक्रार तातडीने संबंधित विभागाकडे वर्ग केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कक्षाच्या कामाचा आढावा घेतील. मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त होणारे अर्ज आणि निवेदन यांचा त्वरीत निपटारा करण्यात यावा अशा सुचना कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here