![कै.सरमळकर स्मृर्ती प्रित्यर्थ प्राथमिक व अंगणवाडी मुलांना मोफत दप्तर वाटप प्राथमिक व अंगणवाडील मुलांना करण्यात आले मोफत दप्तर वाटप](https://sindhudurgsamachar.in/wp-content/uploads/2024/12/कै.सरमळकर-स्मृर्ती-प्रित्यर्थ-प्राथमिक-व-अंगणवाडी-मुलांना-मोफत-दप्तर-वाटप-696x311.jpeg)
⭐सरमळकर यांनी केलेले कार्य म्हापण मध्ये अविरतपणे चालू ठेवणार: जावई हरी शास्त्री
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – म्हापण l संदिप चव्हाण
कै.श्रीकांत सरमळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्मृर्ती प्रित्यर्थ म्हापण येथील केंद्र शाळा नंबर १ मध्ये म्हापण गावातील ६ प्राथमिक शाळा व ७ अंगणवाडीतील एकूण १७५ मुलांना सरमळकर यांच्या कुटुंबियांच्या हस्ते मोफत दप्तर वाटप कार्यक्रम केंद्र शाळा म्हापण नं१ मध्ये संपन्न झाला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ड्रीम-११-संघाला-जेतेप/
यावेळी जावई हरी शास्त्री यांनी सरमळकर यांच्या आठवणींना उजाळा देत सरमळकर यांची म्हापण शांतादुर्गा देवीवर अपार श्रद्धा होती. त्यांनी या पूर्वी म्हापण मध्ये जे कार्य चालू ठेवले तेच कार्य आपण अविरत पणे यापुढेही चालू ठेवणार असे आश्वासन यावेळी बोलताना दिले. या आठवणींना उजाळा देत असतात कार्यक्रमाला उपस्थित असलेली निकी सरमळकर /शास्त्री मुलगी भावनिक झाल्याचेही दिसून आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला दिवंगत माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण, हरि शास्त्री सरमळकर (जावई),रुची सरमळकर,निकी सरमळकर(मुलगी), मुलगी स्नेहा सरमळकर,उपसरपंच सुरेश ठाकूर, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ,माजी शिक्षण व आरोग्य सभापती विकास गवंडे, ग्रामपंचायत सदस्या सिया मार्गी,प्रशांती कोनकर, सुषमा म्हापणकर, तन्वी चौधरी, प्रदिप गवंडे, सिद्धेश मार्गी,खवणे प्राथमिक शाळा मुख्याध्यापक महेश परुळेकर, केंद्र शाळा म्हापण नं१ च्या शिक्षिका अश्विनी गायकवाड, रोहिणी हांडोरे अंगणवाडी सेविका अर्पिता कांदळकर, खवणे अंगणवाडी सेविका सुप्रिया खोत, चव्हाणवाडी अंगणवाडी सेविका मानसी चव्हाण, इतर अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थी,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रघुनाथ उर्फ दाजी जुवाटकर यांनी मानले.