वेंगुर्ला प्रतिनिधी- वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. युवराज निवतकर याने नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप परिक्षेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून ८८ गुणांसह शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्याला दरवर्षी १५ हजार एवढी रक्कम नववी ते बारावीपर्यंतच्या शैक्षणिक खर्चासाठी मिळणार आहेत. या यशाबद्दल त्याचे शिक्षण प्रसारक समितीचे कार्याध्यक्ष दिगंबर नाईक, कार्यवाह प्रभाकर नाईक, मुख्याध्यपक संजय परब, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-अल्ट्रा-झकास-ओटी-2/
फोटो – युवराज निवतकर


