संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार; तर आशा सेविकांचाही होणार सत्कार तसेच दिव्यांगांना करणार” छत्री” वाटप
कणकवली:– शिवसेना नेते तथा कोकण सिंचन महामंडाळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार १४ जुलैला सकाळी १०.३० वा. भगवती मंगल कार्यालयात येथे होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसैनिक व संदेश प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-चर्मकार-समाज-बांधवाना-आव/
या कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते तथा माजी मंत्री भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेनेचे नेते अतुल रावराणे, सतीश सावंत, संजय पडते, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख शैलेश परब, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत- पालव, जान्हवी सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, नंदू शिंदे, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, बाबूराव धुरी, वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळू परब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, माजी जि. पं. सदस्य, सभापती, पंचायत समिती सदस्य, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
संदेश पारकर मित्रमंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम गेले 25 वर्षे सातत्याने केले जात आहेत. या वर्षीही सुद्धा शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले.14 जुलैला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे.”भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली कॉलेजच्या हॉलमध्ये” सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे.तसेच या रक्तदान शिबिरासाठी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर,शहर प्रमुख उमेश वाळके, शहर प्रमुख प्रदीप मसूकर ,सुजित जाधव,उत्तम लोके, वैभव मालंडकर,सोहम वाळके, यांनी केले आहे.
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
कार्यसम्राट शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवस 14 जुलैला होणार आहे.या वाढदिवसानिमित्ताने 10 वी ,12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजत संपन्न होणार आहे.या सत्कार सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य सापळे,सुजित जाधव,उत्तम लोके, वैभव मालंडकर,सोहम वाळके, यांनी केले आहे.
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आशा सेविकांचा होणार सत्कार!
शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची मांदीआळी पाहायला मिळणार आहे. कणकवली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये जिथे प्रशासन पोचू शकत नाही.अशा ठिकाणी आशा सेविका जाऊन आपली सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवत असतात.आशा सेविकांचा सत्कार शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कणकवली शहरातील बचत गटांना “छत्री ” वाटप करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम सोहळा “कणकवली भगवती मंगल कार्यालय सकाळी 11 वाजता “करण्यात येणार आहे .या सत्कार सोहळ्यासाठी कणकवली तालुक्यातील आशा सेविकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महिला शिवसेना जिल्हाप्रमुख नीलम पालव , महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, महिला शहर प्रमुख साक्षी आमडोस्कर ,दिव्या साळगावकर यांनी केले आहे.
१४ जुलैला संदेश पारकर यांचा वाढदिवस;दिव्यांगनां करणार” छत्री” वाटप
शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने विविध कार्यक्रम आयोजन केले आहे.14 जुलै रोजी विविध कार्यक्रमांची मादीआळी पाहायला मिळणार आहे. या वाढदिवसानिमित्त विशेष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगनां ” छत्री” वाटप करण्यात येणार आहे.” कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.”तरी जिल्ह्यातील दिव्यांगण बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली शिवसेनेचे तालुका प्रमुख शैलेश भोगले, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, यांनी केले आहे.