Kokan: रत्नागिरीची कन्या सोनाली जाधवचा ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया 2025’ किताबाने गौरव

0
27
मिस मद्रासी नॉर्थ इंडिया 2025’ किताब
रत्नागिरीची कन्या सोनाली जाधवचा ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया 2025’ किताबाने गौरव

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l रत्नागिरी –

रत्नागिरीच्या सोनाली चंद्रकांत जाधव हिने २०१६ मध्ये हवाई सुंदरी म्हणून यशस्वी कारकीर्दीला सुरुवात केली. सात वर्षांच्या विमानसेवेतील प्रवासानंतर तिने नुकत्याच झालेल्या एका प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला आणि ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया 2025’ हा बहुमान मिळवून रत्नागिरीचे नाव उज्वल केले.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

सोनाली जाधव या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक सी. ए. जाधव यांची कन्या आहे. तिचे शालेय शिक्षण बारावीपर्यंत रत्नागिरीत झाले असून, पुढील शिक्षण तिने मुंबई आणि गोवा येथे पूर्ण केले. हवाई सुंदरीचे प्रशिक्षण दिल्ली येथे घेतल्यानंतर २०१६ मध्ये चेन्नई विमानतळावर एका आंतरराष्ट्रीय विमान कंपनीसाठी हवाई सुंदरी म्हणून तिची निवड झाली. विशेष म्हणजे तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे.

सोनालीने आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या स्वप्नांना आकार दिला. बालपणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने अथक परिश्रम घेतले, ज्यामध्ये तिच्या पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सध्या सोनाली हवाई सुंदरी म्हणून लीडर पदावर कार्यरत आहे. चेन्नई येथे आयोजित मिस मद्रासी इंडिया स्पर्धेत सहभाग घेत सोनालीने ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया 2025’ किताबावर आपले नाव कोरले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रात तिचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here