प्रतिनिधी – पांडुशेठ साटम
रवींद्र चव्हाण हे कोकणातले मंत्री आहेत त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. पण महामार्ग पूर्ण न झाल्यामुळे सगळ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पण रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यामध्ये काय वाद आहे यांचा आम्हाला रस नाही पण सरकार मध्ये एक वाक्यता नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं आणि त्यामुळेच कोकणचा विकास होऊ शकत नाही निवडणुकीत जे काय कोकणामध्ये पैसे वाटप झाले त्यामुळेच त्यांना विजय मिळाला आहे आता मात्र जनता सुज्ञ झाली आहे ते यापुढे त्यांची जागा दाखवतील
रवींद्र चव्हाण हे कोकणातले मंत्री आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. परंतु त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण न झाल्यामुळे चाकरमानी, पर्यटक, व्यावसायिक या सगळ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्णावस्थेत असलेल्या महामार्गाचा तोटा सिंधुदुर्गला होत आहे. गतवर्षीच्या गणेशोत्सवात हा महामार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम या दोन नेत्यांमध्ये काय वाद आहे यात आम्हाला किंवा कोकणातील जनतेला काही देणेघेणे नाही. लवकरात लवकर महामार्ग सुरू झाला पाहिजे.अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
ज्याप्रमाणे दोन नेते एकमेकांवर आरोप करत आहेत त्यावरून त्या दोन पक्षात आणि सरकारमध्ये एकवाक्यता नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सरकारमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे कोकणचा विकास त्यांच्याकडून होऊ शकत नाही. निवडणुकीत कोकणामध्ये पैसे वाटप करून आणि लोकांची दिशाभूल केल्यामुळेच त्यांना विजय मिळाला आहे. आता मात्र कोकणची जनता सुज्ञ झाली आहे. जनता याचा नक्कीच अभ्यास करेल. आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनता पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठिशी राहील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.