वेंगुर्ला/वार्ताहर:-:-केळुस – कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच मंगळवार दि.९ एप्रिल ते बुधवार दि.१७ एप्रिल २०२४ या कालावधीत जिल्हास्तरीय सामाजिक नाट्य स्पर्धाबरोबर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कालवीबंदर येथील नवतरुण उत्साही कला,क्रिडा मंडळ व श्री विठ्ठल रखुमाई उत्सव कमिटी व ग्रामस्थ कालवीबंदर यांच्यावतीने करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ल-भाजपच्या-पालकम/
मंगळवार दि.९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७-३० वाजता श्री देव ब्राम्हण प्रासादिक वारकरी भजन मंडळ मोबारवाडी केळुस यांचे भजन,रात्री ९ -३० वाजता सामाजिक नाट्य स्पर्धेचे उद्घाटन (मान्यवरांच्या उपस्थितीत) होणार असुन, रात्री १० वाजता श्रींची इच्छा कलामंच नाट्यमंडळ तेंडोली यांचे सामाजिक नाटक “देव नाही देव्हाऱ्यात” होणार आहे.
बुधवार दि.१० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७-३० वाजता श्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ परूळे यांचे भजन,रात्री १० वाजता आई सातेरी नाट्यमंडळ मालवण (देऊळवाडी) यांचे सामाजिक नाटक “सात – बारा” होणार आहे.
गुरुवार दि.११ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७-३० वाजता श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ आंदुर्ला यांचे भजन,रात्रौ १० वाजता अमर जवान क्रिएशन मंडळ नेतर्डे (बांदा ) तालुका सावंतवाडी यांचे सामाजिक नाटक “कोर्टात खेचिन” होणार आहे.
शुक्रवार दि.१२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता ह.भ.प.मकरंद देसाई बुवा (तेंडोली) यांचे किर्तन, रात्री १० वाजता इंद्रधनु कलामंच दाभोली यांचे सामाजिक नाटक “श्याम तुझी आऊस ईली रे” होणार आहे.
शनिवार दि.१३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता ह.भ.प.स्नेहलदिप सामंत बुवा (वालावल) यांचे किर्तन,सायंकाळी ७-३० वाजता श्री देवी तारादेवी प्रासादिक भजन मंडळ केळुस यांचे भजन,रात्रौ १० वाजता मधलावाडा ग्रामस्थ,यशवंत बाल नाट्य मंडळ आचरे पिरावाडी यांचे सामाजिक नाटक “गावय” होणार आहे.
रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता प.पू.श्री नामदेव महाराज भक्त मंडळी यांचे भजन, सायंकाळी ७-३० वाजता श्री.सिध्देश्वर प्रासादिक भजन मंडळ मुणगी यांचे भजन,रात्रौ १० वाजता अक्षर सिंधू साहित्य कलामंच नाट्यमंडळ कणकवली यांचे सामाजिक नाटक “सुजाता मेली न्हाय”. होणार आहे.
सोमवार दि.१५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री.ज्ञानेश्वर महाराज वारकरी भजन मंडळ शिरोडा यांचे भजन, रात्रौ १० वाजता नारायणश्रीत नाट्य मंडळ आसोली (शिरोडा) यांचे सामाजिक नाटक “वडाचीसाल पिंपळाक” होणार आहे.
मंगळवार दि.१६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते १ वाजता श्री.विठ्ठल विठ्ठल नामजप, सायंकाळी ५ वाजता श्री देव वेतोबा प्रासादिक वारकरी भजन मंडळ मायनेवाडी – कोचरा यांचे भजन,रात्रौ १० वाजता ग्रामस्थांचे भजन, त्यानंतर ह.भ.प.श्री. उत्तम केळुसकर (बुवा) यांचे हनुमान जन्मावर आधारित वारकरी किर्तन,रात्रौ १२ वाजता हनुमान जन्म,श्रींची पालखीतून मिरवणूक व तिर्थ प्रसाद होणार आहे.
बुधवार दि.१७ एप्रिल २०२४ रोजी श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री.विठ्ठल रखुमाई मंदिरात सकाळी ७ ते १० वाजता ओटी भरण्याचा कार्यक्रम, सकाळी १० ते १२ वाजता ग्रामस्थांचे भजन व त्यानंतर श्री रामजन्मवार आधारित ह.भ.प. उत्तम केळुसकर बुवा यांचे वारकरी किर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म ( डिमकर कुटुंबीयांच्या हस्ते श्रीरामाला पाळण्यात घालण्यात येईल) नंतर श्रींची ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यानंतर तिर्थ प्रसाद “महाप्रसाद” होणार आहे.तसेच सायंकाळी ४ ते ५ वाजता गायन श्री.ज्योतीराज केळुसकर (खवणे), सायंकाळी ५- ३० वाजता श्री विठ्ठल रखुमाई सचित्र वारकरी भजन मंडळ निवती यांचे भजन,रात्री ८ ते १० श्रींची पालखी मिरवणूक, रात्रौ १० वाजता नवतरुण उत्साही,कला, क्रिडा मंडळाचे सामाजिक ३ अंकी “जन्मदाता” हे नाटक होणार आहे.
तर गुरुवार दि.१८ एप्रिल २०२४ रोजी रात्रौ ८ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, रात्रौ ठिक १० वाजता सामाजिक नाट्य स्पर्धाचे व रेकॉर्ड डान्स स्पर्धाचे मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन नवतरुण उत्साही,कला, क्रिडा मंडळ व श्री विठ्ठल रखुमाई उत्सव कमिटी व ग्रामस्थ कालवीबंदर यांच्यावतीने करण्यात आले आहे.