Kokan: राष्ट्रीय ग्रामीण विकास फाऊंडेशन कडून राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार मोहन जाधव यांना प्रदान

0
39
राष्ट्रीय ग्रामीण विकास फाऊंडेशन,राष्ट्रीय आदर्श शिक्षक,
राष्ट्रीय ग्रामीण विकास फाऊंडेशन राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार मोहन जाधव यांना प्रदान

हरमल गोवा येथील कार्याक्रमात मोहन जाधव यांना पुरस्कार प्रदान

सुनिता भाईप/ सावंतवाडी
राष्ट्रीय ग्रामीण विकास फाऊंडेशन,बेळगावी कडून देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार हरमल गोवा येथील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री.सरस्वती विद्यालय आरवली टांक येथील कार्यरत उपक्रमशील शिक्षक श्री.मोहन जाधव यांना प्रदान नुकताच प्रदान करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/kokan-मुसळधार-पावसाने-पाडलोस-य/

सदर राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा गोवा, दिल्ली, कर्नाटक महाराष्ट्र, गुजरात, गोवा, या राज्यातून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो.मोहन जाधव गेली
अनेक वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निःस्वार्थी व भरीवपणे काम करत आहेत. या केलेल्या त्याच्या कार्याचा व वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या आधारावर त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

श्री. मोहन जाधव यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीची सुरूवात अ.वि.बावडेकर विद्यालय शिरोडा येथून केली. त्यानंतर श्री.सरस्वती विद्यालय आरवली टांक व माऊली विद्यामंदिर रेडी या शाळेत सुद्धा त्यांनी अध्यापनाचे काम केले.संगीत क्षेत्रातही मोहन जाधव यांना आवड आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना गायना मध्ये ही मार्गदर्शन केले आहे. यापुढे आपले शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात असेच काम पुढे सुरू रहाणार असल्याचे श्री मोहन जाधव यांनी सांगितले. त्यांनी मिळालेल्या पुरस्कारांबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here