मुख्य अभियंता मा.श्री.भागवत यांच्या हस्ते ऊर्जा पुरस्काराचे वितरण
कोकण परिमंडळ : महाविरतणचा 18 व्या वर्धापनदिना निमित्ताने कोकण परिमंडळात गत वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वीज कर्मचाऱ्यांना ऊर्जा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ‘ऊर्जा शिरोमणी’ पुरस्काराचे मानकरी चिपळूण विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर हे ठरले. यावेळी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सातत्यपुर्ण वीजसेवा देण्याचा निर्धार केला आहे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-गुलाम-बेगम-बादशा/
याप्रसंगी वीज कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मा.श्री.भागवत म्हणाले की, दुर्गम भागात वीजसेवा देण्याचे आव्हानात्मक काम करताना त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे. वीज ही एक मुलभूत सेवा बनली आहे. आजघडीला वीजेशिवाय दैनंदिन मानवी जीवन विस्कळीत होऊन जाते. ही बाब लक्षात ठेवून वीज कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आपले कामकाज करावे. प्रत्येकाने कोकणाच्या विकासासाठी पुरक ठरणारी कामगिरी करावी. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे कौतुक करून श्री.भागवत यांनी यापुढेही जोमाने काम करून सहकाऱ्यांना प्रेरणा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दि.07 जून रोजी रत्नागिरीस्थित परिमंडळ कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमास अधिक्षक अभियंता मा.श्री.विनोद पाटील, अधिक्षक अभियंता मा.श्री.नितीन पळसुलेदेसाई, अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा प्र.) मा.राजश्री मोरे, सहाय्यक महाव्यवस्थापक मा.श्री.वैभव थोरात, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.श्री.आप्पासाहेब पाटील, कार्यकारी अभियंता मा.श्री. विशाल शिवतारे (खेड), मा.श्री. बाळासाहेब मोहिते (कणकवली), मा.श्री. विनोद विपर (कुडाळ), मा.श्री. विनय तिरमारे (रत्नागिरी ), मा.श्री.अजित अस्वले (चाचणी विभाग), प्रणाली विश्लेषक मा.श्री. हर्षद आपटे, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा प्र.) लक्ष्मण अन्नलदास यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊर्जा शिरोमणी, ऊर्जारत्न, ऊर्जाभूषण या तीन श्रेणीत पुरस्कार वितरीत करण्यात आले.
ऊर्जारत्न : उपकार्यकारी अभिंयता सुरेश पालशेतकर (चिपळूण ग्रामीण), नबील मोगल (संगमेश्र्वर), नाझीम शेख (देवगड), संदीप भुरे (सावंतवाडी शहर), प्रदिप लटपटे (चाचणी विभाग), बालाजी वाघमोडे (सिंधुदुर्ग मंडळ), सहाय्यक अभियंता प्रशांत सासने, मिलींद मोने, उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) अनूराधा गोखले, संजय तेरेखोलकर, उपव्यवस्थापक (मानव संसाधन) मनोज माने, सहाय्यक लेखापाल संदीप डूकरे (वैभववाडी), जयेश तांडेल (कुडाळ), संतोष आयरे (संगमेश्वर), प्रशांत गवखडकर (रत्नागिरी शहर), नयना गांधी (चिपळूण) यांना ‘ऊर्जारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ऊर्जाभूषण : शाखाधिकारी कमलेश घाडगे, राहूल मदणे, निखिल बेडेकर, नेहा मेथे, धनाजी कळेकर, बकूळ माने, पियूषी चांदेकर, शिल्पा माने, दिपक मुगडे, सुजीत शिंदे, सहाय्यक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) आरती कांबळे, स्वप्निल उमरीकर, लेखा कर्मचारी रोहीणी नार्वेकर, ओंकार जाधव, निलेश केळकर, निखिल कदम, अभिजीत हार्डीकर, राजेंद्र भरणकर, मानव संसाधन कर्मचारी प्रमोद गावडे, संदेश चवेकर, वाहिनी कर्मचारी नरेंद्र जोशी, आमित वाघाटे, त्रुशांत जाधव, दिपक परब, प्रशांत पाटणकर, संजय गोसावी, साईनाथ कांबळे, दिगंबर मातले, दिपक पाकटे, बाळू चव्हाण, रामजी हारेकर, महेश मूंडे, चंद्रकांत लोमटे, कृष्णा बेंडल, प्रियंका घाणेकर, यंत्रचालक प्रकाश फोंडे, जितेंद्र जावकर, संदीप नेटके, संजय पाटील, श्रीकृष्ण खोत, नितीन मरुगडे यांना ‘ऊर्जाभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
छायाचित्र ओळी- मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांच्या हस्ते ‘ऊर्जा शिरोमणी’ पुरस्कार स्वीकारताना चिपळूण विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर समवेतअधिक्षक अभियंता मा.श्री.विनोद पाटील, मा.श्री.नितीन पळसुलेदेसाई, मा.राजश्री मोरे, सहाय्यक महाव्यवस्थापक मा.श्री.वैभव थोरात.