Kokan: वाकवली हायस्कूल येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

0
33
वाकवली हायस्कूल,माजी विद्यार्थी स्नेह मेळावा ,
वाकवली हायस्कूल येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l दापोली –

वाकवली, ता. दापोली येथील वि. रा. घोले विद्यालयात एस.एस.सी. मार्च- १९९६ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या अर्धपुतळ्याचे, छत्रपती शिवाजी महाराज व देवी सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने या स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली. तब्बल २७ वर्षानंतर शाळेच्या भेटीचा व आपल्या सवंगड्यांना भेटण्याचा आनंद माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाप सन्मान करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-करूळ-गगनबावडा-घाट-रस्ता/

काही माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली व शाळेतील गतस्मृतींना उजाळा दिला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत जाधव, मिलिंद धुमाळ यांनी हा मेळावा पार पडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. यानिमित्ताने विद्यालयास संगणक संच व कलर प्रिंटर देण्याचे मान्य केले. शेवटी अल्पोपहार व चहापानानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद धुमाळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here