दापोली- दैनंदिन अध्यापन, अध्ययन, अभ्यास यांसारख्या औपचारिक गोष्टींना बाजूला ठेवून दर आठवड्यातील शनिवारी शाळेतील विद्यार्थ्यांना अनौपचारिक व रंजक शिक्षण मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘आनंददायी शनिवार ‘ हा साप्ताहिक उपक्रम सुरु केला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सुजाता-सौनिक-यांनी-स्वि/
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकताच आनंददायी शनिवार अनुभवला. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नदीस विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली. नदीचा उगम, नदीचा मार्ग, नदीचा प्रवाह, नदीतील दगडधोंडे, शेवाळ, जलपर्णी, जलचर, उभयचर, नदीच्या काठावरील मानवी वस्ती, वनराई, सजीवसृष्टी यांबाबत शिक्षकांनी माहिती दिली. नदीवरील साकव, पूल, त्यांची आवश्यकता यांचीही माहिती देण्यात आली. नदीबद्दल जाणून घेताना सर्व शालेय विद्यार्थ्यांनी नदी या परिसंस्थेची माहिती घेतली. आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या निमित्ताने दर शनिवारी चंद्रनगर शाळेत विविध उल्लेखनीय उपक्रमांचे नियोजन व आयोजन करण्यात आले आहे.