Kokan: विश्वकर्मा योजना शिबीराचे आयोजन

0
42
विश्वकर्मा योजना,
विश्वकर्मा योजना शिबीराचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा बलुतेदार यांच्यासाठी विश्वकर्मा योजना आणली आहे. बेकारांना रोजगार देण्याचे ध्येय असून जिल्ह्यातील सीएससी सेंटरद्वारे याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त फायदा करून घ्या व तुम्ही आपला सर्वांगीण विकास करा, असे प्रतिपादन बँक ऑफ बडोदाचे अधिकारी दिलीप सुतार यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वैशिष्ट्यपूर्ण-कलादालन/

वेंगुर्ला भाजपाच्यावतीने तालुका कार्यालयात विश्वकर्मा योजना शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, विश्वकर्मा समाजाचे जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री, सीएससी सेंटरचे  डिस्ट्रिक्ट मॅनेजर हर्षद ढेकणे, ओरोस सीएससी सेंटरचे सिद्धेश ढेकणे, सौ.सुतार, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक, जयंत मोंडकर, माजी नगरसेविका श्रेया मयेकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, बुथप्रमुख रविंद्र शिरसाट, दादा तांडेल आदींसह भाजपा पदाधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी पीएम विश्वकर्मा योजना विनातारण लोन उपलब्ध असून  याबाबत मागणी करावी असे आवाहन श्री.ढेकणे यांनी केले. पीएम विश्वकर्मा योजना बारा बलुतेदार यांचे रजिस्ट्रेशन करण्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पीएम विश्वकर्मा या योजनेचा लाभ  सुतार, लोहार,सोनार, कुंभार न्हावी, फुलारी, धोबी, शिंपी, मेस्त्री, चर्मकार,  अस्त्रकार, बोटबांधारी,  अवजारे बनवणारे, खेळणी बनवणारे, चावी बनविणारे, मासेमारी जाळे विणणारे अशा अठरा प्रकारच्या पारंपारिक कारागीरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना सुरू केल्यानंतर या योजनेची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा तसेच तालुका भाजपामार्फत सक्रियरित्या सुरू असून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे यावेळी बोलताना प्रसन्ना देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यातील सुमारे ९४५ जणांनी रजिस्ट्रेशन केले आहे. वेंगुर्ला येथे झालेल्या या योजनेमध्ये एकूण ८५ जणांनी नोंदणी केली.

फोटोओळी  – विश्वकर्मा योजना शिबिराबाबत बँक ऑफ बडोदाचे अधिकारी दिलीप सुतार यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here