Kokan: विस्थापितांना नुकसान भरपाई कृपया तातडीने अदा करावी -महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांची मागणी

0
44
विस्थापितांना नुकसान भरपाई कृपया तातडीने अदा करावी
विस्थापितांना नुकसान भरपाई कृपया तातडीने अदा करावी

कणकवली – बहुतांशी विस्थापितांची यादीसंबधीत प्रशासनला सादर – रत्नागिरी मुंबई गोवा हायवे नं ६६ बावनदी ते आरवली रस्त्याच्या लगतचे विस्थापित होणारी दुकाने, हॉटेल्स, टपर्या, घरे, फळवाले, यांना शासकिय दराने नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. आरवली येथील पाच दुकानांची मोजणी होऊन अाॅर्डर मंजूरीसाठी कोकण भूवन येथे दिनांक पाठविण्यात आले आहे. ते काही त्रुटी काढून आपल्या कार्यालयाकडे आल्याचे समजते तरी त्याची पुर्तता करून तातडीने कोकण भूवन येथे पाठवून अाॅर्डर प्रमाणे त्यांना नुकसान भरपाई अदा करावी.https://sindhudurgsamachar.in/kokan-आमच-कोकण-आमची-कणकवली-उडा/

सन २०१६ पासून सातत्याने वर विषयात उल्लेख केलेले हातावर पोट असलेले विस्थापित रस्ता नं ६६ मध्ये होत असलेले रूंदीकरण यांना नुकसान भरपाई मिळावी. म्हणून सातत्याने लेखी पत्र व्यवहार, बैठका, धरणे आंदोलने आतापर्यंत ८९ वेळा केली गेली . या सर्वांचा परीपाक म्हणून या संदर्भात भूसंपादन अधिकारी शुक्रवार दिनांक १३/१०/२०२३ रोजी स्वतः आणि नॅशन हायवे ऑथरिटी डॅप्युटी इंजिनिअर यांच्या समवेत आणि विस्थापितांच्या समवेत बैठक घेवून ज्या विस्थापितांकडे सदर जागेवर जे विस्थापित होते अगर आहेत यांचे ग्रामपंचायत असेसमेन्ट उतारे, घरपावती, पाणीपट्टी, लाइट बिल, व्यवसाय कर, आणि इतर कोणत्याही अधिकृत पावती असेल त्याला नुकसान भरपाई दिली जाईल असा महत्वपूर्ण निर्णय संयुक्त बैठकीमध्ये घेण्यात आला होता.

तसेच या बाबत पावती किंवा कागदपत्रांच्या आधारे भूमिअभिलेख यांना संयुक्त मोजणी केली गेली १६/१०/२०१७ मागील अधिकारी यांच्या जबाबाच्या आधारे संयुक्त मोजणी पत्रकात नमुद करुन त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, त्याप्रमाणे अाॅर्डर मंजूर करून विस्थापितांना नुकसान भरपाई कृपया तातडीने अदा करावी अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here