वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ल्याची सुकन्या कु. नेहा महेंद्र आरोलकर हिची जागतिक बँक आणि भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत स्पेन येथील विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून ८ नोव्हेंबर रोजी ती स्पेन येथे जाण्यासाठी रवाना होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-अंधश्रद्धा-निर्मूलन-समि/
जागतिक स्तरावरील कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान अवगत व्हावे व विद्यार्थी डिजिटल शेती तंत्रज्ञानामध्येही कुशल व्हावेत या उद्देशाने जागतिक बँक आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे देशातील विद्यार्थ्यांना कृषी विषयक उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविण्यात येते. यावर्षी कृषी तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या स्पेन या देशामध्ये डिजिटल कृषी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी कु.नेहा आरोलकर हिची निवड करण्यात आली आहे.
कु.नेहा हिने कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील कृषी महाविद्यालयातून आपले बीएससी व्हॉर्टिकल्चरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयातून एमएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.सध्या ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात उद्यानविद्या विषयात पीएचडी करीत आहे.
वेंगुर्ला-भटवाडी येथील दुकान व्यावसायिक महेंद्र आरोलकर आणि सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा आरोलकर यांची कु. नेहा ही कन्या असून तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
फोटो – नेहा आरोलकर